बिजनेस

जिओच्या ग्राहकांची मज्जाच मज्जा

जिओच्या ग्राहकांसाठी एक खुशखबर आहे. रिलायन्स जिओने आपल्या वर्धापनदिनानिमित्त जिओ युजर्ससाठी खास ऑफर आणली आहे. निवडक रिचार्ज प्लानवर ही ऑफर मिळणार आहे. या ऑफरनुसार, ग्राहकांना ८९९ आणि ९९९ रुपयांच्या तिमाही व ३५९९ रुपयांच्या वार्षिक प्लानवर सातशे रुपयांचा फायदा होणार आहे. ही ऑफर आजपासून दहा सप्टेंबरपर्यंत मिळणार आहे.
जिओचे सध्या ४९ कोटींहून अधिक ग्राहक आहेत. यात १३ कोटी ५ जी युजर्सचा समावेश आहे. या ऑफरमध्ये १७५ रुपयांच्या १० ओटीटी अ‍ॅप्सच्या सब्सक्रिप्शनसह दहा जीबी डेटा पॅक मिळेल. याची वैधता २८ दिवसांची असेल.
८९९ रुपयांचा प्रीपेड प्लॅन- या प्लानची वैधता ९० दिवसांची आहे. प्लानमध्ये ग्राहकांना सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगसह दररोज शंभर एसएमएस मिळतात. याशिवाय ग्राहकांना दररोज दोन जीबी डेटा आणि २० जीबी अतिरिक्त डेटा मिळतो. या प्लॅनचे ग्राहक अनलिमिटेड ५ जी डेटासाठी पात्र आहेत.
९९९ रुपयांचा प्रीपेड प्लान- हा प्लान ९८ दिवसांचा आहे. प्लानमध्ये ग्राहकांना सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगसह दररोज शंभर एसएमएस मिळतात. याशिवाय दररोज दोन जीबी डेटा मिळतो. या प्लॅनचे ग्राहक अनलिमिटेड ५ जी डेटासाठी पात्र आहेत.
३५९९ रुपयांचा प्रीपेड प्लान- हा प्लान ३६५ दिवसांसाठी आहे. प्लानमध्ये ग्राहकांना सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगसह दररोज शंभर  एसएमएस मिळतात. याशिवाय ग्राहकांना दररोज २.५ जीबी डेटा मिळतो. या प्लानचे ग्राहक अनलिमिटेड ५जी डेटासाठी पात्र आहेत. 

Related Articles

Back to top button