महाराष्ट्र
लाडकी बहीण योजनेचा आता नवीन फॉर्म
- राज्य सरकारने अलीकडे मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना सुरू केली आहे. या योजनेला सोलापूरसह अन्य भागात जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान, या योजनेसाठी राज्य सरकारने अर्ज भरण्यासाठी सप्टेंबर महिन्यापर्यंत मुदतवाढ दिली आहे. यासाठी सरकारने नवीन जीआर काढला आहे. आतापर्यंत जवळपास दीड कोटींहून अधिक महिलांना या योजनेचा लाभ मिळाल्याचे सरकारकडून सांगण्यात आले आहे. तर ज्या महिलांचे अर्ज रद्द झाले आहेत, त्यांना या योजनेचा लाभ घेता आला नाही. परंतु, ज्या महिलांनी अर्ज भरला नाही, त्यांना आता नवीन अर्ज भरता येणार आहे. नवीन अर्ज व्यवस्थित आणि अचूकपणे भरल्यास तुमच्या खात्यात योजनेचे साडे चार हजार रुपये पैसे जमा होऊ शकतात.
यासाठी ladkibahin.maharashtra.go.in या पेजला भेट द्यायची आहे. या पोर्टलवर आल्यानंतर तुम्ही पाहू शकता की, एक कोटींहून अधिक अर्ज दाखल झाले आहेत. या पोर्टलवर 84 लाखांहून अधिक अर्ज मंजूर झालेले आहेत. सप्टेंबर महिन्यापर्यंत अर्ज कसा भरायचा, हे तुम्हाला सांगणार आहोत.
अर्ज कसा करायचा?- अर्जदार लॉग इन या ऑप्शनवर क्लिक करा. नवीन असल्यास खाते तयार करा, या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर आधारकार्डप्रमाणे तुमचे नाव इंग्रजीत टाईप करा. मोबाईलचा नंबर टाकून पासवर्ड सेट करा. जिल्हा, तालुका, गाव, महानगरपालिका किंवा नगरपालिका असेल तर त्यावर क्लिक करा. - नसेल तर लागू नाही, यावर क्लिक करा. ऑथोराईज्ड पर्सनमध्ये तुमच्या प्रोफेशनुसार विकल्प निवडा. टर्म्स अँड कंडिशन्सवर क्लिक करून अॅक्सेप्ट करा. कॅप्चा भरा आणि साईन अपवर क्लिक करा. त्यानंतर तुमचे साईन इन यशस्वी होईल. त्यानंतर लॉग इन पर्यायावर क्लिक करा. अर्ज करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज या पर्यायावर क्लिक करा.