देश - विदेश

ब्रेकिंग! लष्कराचे वाहन थेट दरीत कोसळले

  1. सिक्कीममध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. सिक्कीममधील पाकयोंग जिल्ह्यातील जुलुक या सिल्क रुटवर झालेल्या अपघातात भारतीय लष्कराचे किमान चार जवान ठार झाले. अधिका-यांनी सांगितले की, लष्कराचे वाहन सिल्क रूटवरील दलोपचंद दरीत कोसळल्याने हा अपघात झाला आणि जवान मृत्युमुखी पडले. घटनास्थळी मदत आणि बचावकार्य सुरू करण्यात आले आहे.
    चालक प्रदीप पटेल (मध्य प्रदेश), डब्ल्यू पीटर (मणिपूर), नाईक गुरसेव सिंग (हरियाणा) सुभेदार के थंगापांडी (तामिळनाडू) अशी मृत जवानांची नावे आहेत. सर्व मृत लष्करी जवान पश्चिम बंगालमधील बिनागुरी येथील तुकडीतील होते.
    जवानांच्या निधनामुळे लष्करावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान, भारतीय लष्कराचे अन्य जवान घटनास्थळी दाखल झाले असून तपास लष्कराने घटनेचा तपास सुरू केला आहे.

Related Articles

Back to top button