क्राईम

खुनाचा बदला घेण्यासाठी रचला भयंकर कट

पुणे शहरात मागील काही दिवसांपासून गुन्हेगारी घटना वाढल्या आहे. गॅंगवॉरचे सत्र देखील सुरू आहे. सिंहगड रोड परिसरातून देखील एक अशीच घटना उघडकीस झाली आहे. पुर्वी केलेल्या खुनी हल्यातून बचावलेल्या तरुणावर दोघांनी पुन्हा कोयत्याने सपासप वारकरून त्याला संपविण्याचा प्रयत्न केला. 
या घटनेत संबंधित करून गंभीर जखमी झाला आहे. मात्र त्याची प्रकृती चिंताजनक आहे. या संपूर्ण मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 
सागर चव्हाण असे हल्लात जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी हवेली पोलिसांनी एका अल्पवयीन मुलासह दोघांना ताब्यात घेतले आहे. किरकटवाडी फाट्याजवळील सीडब्ल्युपीआरएस कॉलनी गेटच्या समोर सकाळी सातच्या सुमारास घडली.
दरम्यान सागरवर हल्ला करण्यासाठी आरोपींनी कट रचल्याचे समोर आले आहे. एका महिन्यापूर्वी इन्स्टाग्रामवर मुलीच्या नावाने फेक अकाउंट तयार केले. त्याची रिक्वेस्ट सागरला पाठवली. महिनाभर चॅटिग करून त्याला जाळ्यात अडकवले. त्यानंतर खडकवासला परिसरात त्याला भेटण्यासाठी बोलावले. 
मुलगी भेटण्यासाठी बोलावत असल्याचे पाहून सागर सकाळी गेला. एका मित्रासोबत तो किरकिटवाडी परिसरात येऊन थांबला. त्याने संबंधित इन्स्टावरील त्या फेक अंकाऊटवर ‘तु कधी येतेय, आम्ही पोहोचलोय’ असा मेसेज केला आणि करंट लोकेशनही पाठवले. 
त्यानंतर लागलीच दुचाकीवरून तोंडाला रुमाल बांधून आलेल्या दोघांनी दुचाकीला लाथ मारून दुचाकी खाली पाडली. त्यात सागर खाली पडला. नंतर आरोपींनी कोयत्याने सपासप वार केले. दरम्यान, यात तो गंभीर जखमी झाला आहे. पुढील तपास हवेली पोलिस करत आहेत.

Related Articles

Back to top button