महाराष्ट्र
खुशखबर! लाडक्या बहिणींना दोन हजार रुपये देणार

राज्य सरकारने अलीकडे मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना सुरू केली आहे. या योजनेला सोलापूरसह अन्य भागात जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान, आज महाराष्ट्र दौऱ्यावर असलेले काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी सांगलीतून भाषण करताना लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठी घोषणा केली. खर्गे म्हणाले, आमचे सरकार आल्यास आम्ही लाडक्या बहिणींना दोन हजार रुपये महिन्याला देऊ. यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि खासदार राहुल गांधी हेही उपस्थित होते.
खर्गे पुढे म्हणाले की, आमचे सरकार आल्यास लाडकी बहिण योजनेसाठी आम्ही महिलांना दोन हजार रुपये देणार आहे. मोदी सरकारने तोडण्या फोडण्याच्या पलिकडे काय केले ते सांगा. महाराष्ट्र जर जिंकला तर सारा देश जिंकेल आणि लवकरच भाजपाचे सरकार जाईल.