राजकीय

शरद पवारांकडून गडकरी यांची भरभरून प्रशंसा

  • छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या दुर्घटनेनंतर सध्या राज्यातील राजकीय वातारावण तापले आहे. या प्रकरणावरून राज्य सरकारवर टीका होत आहे. महाविकास आघाडीचे नेते देखील या पुतळ्याच्या बांधकामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत आहे. आठ महिन्यापूर्वी मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले होते. 
  • मात्र हा पुतळा आठ महिन्यात कोळल्याने राज्यात संतापाची लाट पसरली आहे. यातच जर कामाचा दर्जा नीट ठेवायला असता तर पुतळा कोसळला नसता, अशी प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे.
    तर दुसरीकडे आज कोल्हापूरमध्ये पत्रकार परिषदेमध्ये बोलताना गडकरी हे अतिशय चांगले काम करणारे नेते आहे आणि त्यांनी जर ते दर्जाबाबत बोलत असतील तर त्यावर राज्य सरकारने लक्ष द्यावे, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी दिली.
    पवार म्हणाले की, केंद्रामध्ये गडकरी हे अतिशय चांगले काम करणारे नेते आहेत. ते कायम कोणतेही काम हाती घेताना बारकाईने त्यात लक्ष देतात. त्यांनी अनेक रस्ते केलेत, त्यांचा दर्जा चांगला आहे. त्यांनी जर काही दर्जाबाबत बोलत असतील तर त्यावर राज्य सरकारने लक्ष द्यावे, असे पवार म्हणाले.

Related Articles

Back to top button