सोलापूर

सोलापूर ब्रेकिंग! मृत्यूनंतरही प्रसादने मने जिंकली

  • कुणी काय केला असे म्हणतात, पण मूळचे वैराग येथील परंतू कामानिमित्त पुणे येथे स्थानिक झालेल्या प्रसाद गोसावी यांनी आपल्या मृत्यूनंतर ही आपले अवयव दान करून स्वतः सह समजाचा  हिशोब चुकता केला आहे.
  • अपघाती निधनानंतर त्यांनी केलेल्या अवयव दानातून पाच जणांना जीवनदान मिळाले असून या कृत्यामुळे ते कायमस्वरूपी स्मरणात राहिले आहेत 
  • एका न्यूज पोर्टलचे वरिष्ठ वार्ताहर असलेल्या प्रसाद गजानन गोसावी यांचा पावणेदोन महिन्यांपूर्वी भीषण अपघात झाल्यामुळे त्यांच्यावर निगडी येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. मृत्यूवर मात करतील असे वाटत असतानाच प्रसाद यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यानंतर प्रसाद यांचे अवयव दान करण्यात आले. 
  • या स्तुत्य निर्णयामुळे प्रसाद हे अवयवदान करणारे आदर्श पत्रकार ठरले आहेत. प्रसाद गोसावी यांच्या मृत्यूनंतर काही तासातच त्यांच्या हृदयाचे एका लष्करी जवानाच्या शरीरात यशस्वीपणे प्रत्यारोपण देखील करण्यात आले. त्यामुळे प्रसादने मृत्युसोबत केलेली झुंज अपयशी ठरली असली तरीही आजही त्याचे हृदय धडधडते आहे. हृदयाबरोबरच दोन फुफ्फुसे (lungs), यकृत (liver), व एक मूत्रपिंड (kidney) व दोन डोळे या अवयवांचेही दान करण्यात आले. त्यामुळे एकूण पाच जणांना नवीन जीवन मिळाले आहे. 
  • प्रसादचे हृदय नेण्यासाठी ग्रीन कॉरिडॉर तयार करण्यात आला होता.पोलीस व लष्करी जवानांच्या संरक्षणात त्याचे हृदय रवाना करण्यात आले. त्यावेळी डी.वाय. पाटील रुग्णालयातील सर्व डॉक्टर व व कर्मचाऱ्यांनी प्रसादला सलामी दिली. एवढेच नाही तर त्याच्या मृत्यूनंतर काही तासातच त्याचे हृदय पुण्याच्या सदर्न कमांड हॉस्पिटलमध्ये नेण्यात येऊन त्या ठिकाणी एका जवानावर हृदयरोपण शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आली. अवयवदानानंतर त्याचा मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला.आज प्रसाद या जगात नसला तरीही त्याचे हृदय अजूनही धडधडत आहे. भविष्यात एखाद्याला त्याच्या डोळ्यांनी हे जग पाहता येणार आहे. 
  • यकृत, फुप्फुसे व किडनी मिळाल्यामुळे संबंधित रुग्णांना नवीन जीवन मिळणार आहे. आपल्या मृत्यूनंतर अवयवदान करणारा आदर्श पत्रकार म्हणून प्रसाद गोसावी कायमस्वरूपी लक्षात राहतील.

Related Articles

Back to top button