सोलापूर

सोलापूर ब्रेकिंग! डॉक्टरांनी जीव घेतला

सोलापूर (प्रतिनिधी) विडी घरकुल येथील संकल्प क्लिनिक येथील डॉक्टर शैलेश माने व डॉक्टर कोमल माने (रा.संकल्प क्लिनिक विडी घरकुल) यांनी मयत अशोक विठ्ठल पल्ली (वय-४६,रा.योगेश्वर नगर,विडी घरकुल) यांच्याकडे ओपीडी बेसीसवर उपचार सुरू केले होते.परंतु अशोक पल्ली यांच्या डाव्या हातास सूज आल्याने त्यांना पुढील उपचाराकरिता त्यांचा मुलगा अभिषेक याने सिव्हिल हॉस्पिटल येथे दाखल केले.त्यानंतर २३ जुलै २०२४ रोजी अशोक पल्ली हे मयत झाले.वरील संशयित आरोपी यांनी अशोक पल्ली यांना तज्ञ डॉक्टरांकडे पाठविणे आवश्यक असताना स्वतः हलगर्जीपणा व निष्काळजीपणाने उपचार करून अशोक पल्ली यांच्या मृत्यूस कारणीभूत झाले आहेत.असे फिर्यादीत म्हटले आहे.
याप्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक भरत मोहन चंदनशिवे (नेमणूक एमआयडीसी पोलीस ठाणे) यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.त्यांच्या फिर्यादीवरून डॉ.शैलेश माने व डॉ.कोमल माने यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.ही घटना १७ ते २२ जुलै दरम्यान संकल्प क्लिनिक विडी घरकुल येथे घडली.पुढील तपास मसपोनि.घोरपडे या करीत आहेत.

Related Articles

Back to top button