सोलापूर

सोलापूर! भावाच्या खात्यावर पैसे टाकण्यासाठी बहीण गेली…

सोलापूर (प्रतिनिधी) बाळीवेस येथील बँक ऑफ महाराष्ट्र या शाखेत भावाच्या खात्यावर पैसे टाकण्यासाठी गेले असता फिर्यादी वंदना सचिन भोसले (वय-३५,रा.मु. पो.खेड, ता.उत्तर सोलापूर) यांना तेथील अज्ञात इसमाने तुम्हाला स्लिप भरून देतो असे म्हणाला.
त्यावेळी स्लिपवर नोटांचे क्रमांक टाकायचे आहे. असे सांगून फिर्यादी वंदना भोसले यांच्याकडून ४९ हजार ५०० रुपये घेऊन फिर्यादी यांची नजर चुकवून त्यातील २४ हजार रुपये हातचालाकिने काढून घेऊन फिर्यादी यांचा विश्वास संपादन करून फसवणूक केली आहे. ही घटना ३ सप्टेंबर रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी वंदना भोसले यांनी जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून,त्यांच्या फिर्यादीवरून अज्ञात इसमावर गुन्हा दाखल झाला आहे.पुढील तपास पोलीस हवालदार शेख हे करीत आहेत.

Related Articles

Back to top button