बिजनेस

खुशखबर ! पेट्रोल-डिझेल होणार स्वस्त?

  • देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती या वाढतच आहेत. परंतु आता खाजगी वाहन असणाऱ्या लोकांसाठी पुढील महिन्यात एक आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे. कारण हाती आलेल्या माहितीनुसार, पुढच्या महिन्यात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये घट होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. 
  • सध्या महागाई मोठ्या प्रमाणात वाढली आहे आणि त्याची झळ सर्वसामान्य लोकांना जास्त बसत आहे. परंतु ऑक्टोबर महिन्यात सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. 
    कारण कच्च्या तेलाच्या किमती झपाट्याने कमी होण्याची शक्यता आहे. जगातील सर्वात मोठ्या कच्चा तेल उत्पादक देशांपैकी सौदी अरेबिया हा एक देश आहे. 
    सौदी अरेबियामध्ये विकल्या जाणाऱ्या कच्च्या तेलाच्या सर्व श्रेणीच्या किमती कमी करण्याचा निर्णय घेऊ शकतो. सौदी अरेबियाने जर हा निर्णय घेतला, तर भारतासाठी ही एक मोठी दिलासा बातमी असणार आहे. कारण देशातील तेल विपणन कंपन्या पेट्रोल डिझेल आणि इतर किमती देखील कमी करू शकतात. कच्च्या तेलाच्या किमती कमी करण्याबाबत सौदी अरेबिया गांभीर्याने विचार करत आहे. 

Related Articles

Back to top button