ब्रेकिंग! नक्षलवाद्यांविरोधात ‘सर्जिकल स्ट्राइक’

Admin
1 Min Read
छत्तीसगड राज्यातील दंतेवाडा आणि बिजापूर जिल्ह्यात आज सुरक्षा दल आणि नक्षलवादी यांच्यात झालेल्या चकमकीत 9 नक्षलवादी मारले गेल्याची माहिती आहे. छत्तीसगडमधील सीमावर्ती भागात नक्षलवादाच्या समूळ उच्चाटनासाठी सुरक्षा दलांनी मोठे अभियान सुरू केले. आज या भागात सुरक्षा दलाचे जवान आणि नक्षलवादी यांच्यात जोरदार धुमश्चक्री उडाली. दोन्ही बाजूंनी जोरदार गोळीबार सुरू करण्यात आला. या चकमकीत नऊ नक्षलवाद्यांना ठार मारण्यात आले. दरम्यान सुरक्षा दलांचे सर्व जवान सुरक्षित आहेत.
पश्चिम बस्तर डिविजनला या भागात नक्षलवादी असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. यानंतर सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आले. याच दरम्यान नक्षल्यांनी गोळीबाराला सुरुवात केली. यानंतर सुरक्षा दलांनीही जोरदार प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली. अधिकाऱ्यांनी सांगितले की, येथील पाच ते सात किलोमीटर जंगलाच्या परिसरात जवळपास 65 नक्षलवादी लपून बसल्याची शक्यता आहे. याची माहिती मिळाल्यानंतर दंतेवाडा आणि बिजापूर जिल्हा पोलीस आणि सुरक्षा दल यांनी संयुक्तपणे अभियान राबवले. रात्रीच्या वेळी जवान याठिकाणी पोहोचले. त्यानंतर गोळीबाराला सुरुवात झाली. या भागात अजूनही चकमक सुरूच आहे. चकमक संपल्यानंतर सविस्तर माहिती मिळेल. 
Share This Article