सोलापूर
सोलापूर ब्रेकिंग! डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे रुग्णाचा मृत्यू

सोलापूर (प्रतिनिधी) डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे रुग्णाचा मृत्यू झाल्याप्रकरणी चार जणांविरुद्ध सलगर वस्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २ ते ५ एप्रिल २०२४ दरम्यान मीरा हॉस्पिटल यतीमखाना येथे घडली. तब्बल पाच महिन्यानंतर ३ सप्टेंबर २०२४ रोजी सलगर वस्ती पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक उमाकांत शिंदे (नेमणूक सलगर वस्ती पोलीस ठाणे सोलापूर शहर) यांच्या फिर्यादीवरून डॉक्टर हर्षल थडसरे (वय-३६), सिस्टर अनिता हदीमनी (वय-३३), हेल्पर आशिष जाधव (वय-२८) व पेशंट संतोष हदीमनी (वय-४२) (सर्व रा.सोलापूर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, प्रवीण अमृत करंडे (मयत,वय-२७,रा.होमकर नगर, भवानी पेठ, सोलापूर) यांना दारू पिण्याचे व्यसन असल्याने मीरा हॉस्पिटल सर्वसुखी नगर यतीमखाण्या जवळ व्यसनमुक्तीच्या उपचारासाठी दाखल केले होते. त्यावेळी दिनांक.२ एप्रिल २०२४ ते ५ एप्रिल २०२४ रोजी दरम्यान वरील संशयित आरोपी यांनी मयत प्रवीण करंडे यांच्यावर उपचार करताना केलेल्या हलगर्जीपणा व निष्काळजीपणामुळे प्रवीण करंडे यांचा मृत्यू घडून आणल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास मसपोनि. खामकर या करीत आहेत.



