राजकीय

ब्रेकिंग! देशात राजकीय भूकंप

  • आंध्र प्रदेशात सत्ता पालट झाल्यानंतर तेथील राजकीय घटनाक्रम वेगाने बदलू लागला आहे. कारण आता राज्याची सत्ता जगन मोहन रेड्डी यांच्याकडे नाही तर त्यांचे कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी चंद्राबाबू नायडू यांच्या हातात आहे. नायडू यांचा तेलुगू देसम पक्ष केंद्रातही सत्ताधारी एनडीएत सहभागी आहे. याच कारणामुळे आंध्र प्रदेशातील विरोधी वायएसआर काँग्रेसमध्ये पडझड सुरू झाली आहे. पक्षाचे राज्यसभा खासदार मोपीदेवी वेंकटरमण राव आणि बिधा मस्तान राव यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. यानंतर आता असेही सांगितले जात आहे की, वायएसआर काँग्रेसचे आणखी सहा खासदार राज्यसभेतून बाहेर होऊ शकतात.
    वेंकटरमण आणि मस्तान या दोघांनीही टीडीपी प्रमुख चंद्राबाबू नायडू यांची भेट घेतली. या भेटीनंतर दोघेही लवकरच तेलुगू देसम पक्षात सामील होतील, अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. वेंकटरमण यांना पुन्हा राज्यसभा सदस्य म्हणून नामित करण्यात येईल. तर मस्तान बिनशर्त टीडीपीत सहभागी होण्यास तयार झाले आहेत. 
  • यानंतर आता अशीही चर्चा सुरू झाली आहे की, वायएसआर काँग्रेसचे आणखी सहा खासदार राज्यसभेतून बाहेर होऊ शकतात. यातील काही टीडीपी मध्ये तर काही भाजपाचा झेंडा हाती घेण्याची शक्यता आहे. 2019 पासून आंध्र प्रदेशातील राज्यसभेच्या सर्व 11 जागा वायएसआर काँग्रेसच्याच ताब्यात आहेत. पण, यावेळी मात्र राजकीय गणिते बदलण्याची शक्यता आहे.

Related Articles

Back to top button