रेल्वेने बदलले नियम

Admin
1 Min Read
रेल्वे वेळोवेळी अनेक मार्गदर्शक तत्त्वे जारी करत असते. आता रेल्वे प्रशासनाने वेटिंग तिकिटांवर आरक्षित डब्यांमध्ये प्रवास करण्यास पूर्णपणे बंदी घातली आहे. म्हणजेच तुमच्याकडे वेटिंग तिकीट असेल तर तुम्हाला एसी किंवा स्लीपर कोचमध्ये प्रवास करता येणार नाही. जरी तुम्ही स्टेशनवरून तिकीट ऑफलाइन खरेदी केले असेल तर सध्या अशा तिकिटांवरही रेल्वेने आरक्षित डब्यातून प्रवास करण्यास बंदी घातली आहे.
कन्फर्म तिकीट असलेल्या प्रवाशांच्या सोयीसाठी हा निर्णय लागू करण्यात आलाय. पण, यामुळे वेटिंग तिकिटांवर प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांना मोठा त्रास होणार आहे. याबाबत रेल्वेकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
भारतीय रेल्वेचा नियम आहे की जर एखाद्या प्रवाशाने रेल्वे स्टेशनवरून वेटिंग तिकीट खरेदी केले तर तो आरक्षित डब्यातूनही प्रवास करू शकतो. जर तुमच्याकडे एसीचे वेटिंग तिकीट असेल तर तुम्ही एसीमध्ये प्रवास करू शकता आणि जर तुमच्याकडे स्लीपरसाठी वेटिंग तिकीट असेल तर तुम्ही वेटिंग तिकिटावर स्लीपर कोचमध्ये प्रवास करू शकता.
रेल्वेचा स्पष्ट नियम आहे की, जर तुम्ही खिडकीतून तिकीट घेतले असेल आणि ते वेटिंगमध्ये असेल तर ते रद्द करा आणि पैसे परत मिळवा. असे न करता प्रवासी डब्यात चढून प्रवास करतात.
Share This Article