देश - विदेश
सासरी येण्यास नकार दिल्याने पती संतापला

देशातील विविध भागात अलीकडे गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. दरम्यान, बिहारच्या पाटण्यात आज पहाटे धक्कादायक घटना घडली. एका व्यक्तीने पत्नी आणि मेहुणीवर गोळ्या झाडून स्वत:ही आत्महत्या केली.
- या घटनेत पत्नीचा जागीच मृत्यू झाला असून मेहुणी गंभीर जखमी झाली आहे. तिची प्रकृती चिंताजनक आहे. संबंधित व्यक्तीची पत्नी अनेक दिवसांपासून तिच्या माहेरी राहत होती आणि तिला तिच्या सासरच्या घरी जायचे नव्हते. पती तिला घ्यायला आला असता तिने पुन्हा नकार दिला. यामुळे संतापलेल्या पतीने असे धक्कादायक पाऊल उचलले.
दीपक कुमार असे आरोपीचे नाव आहे. दीपकच्या पत्नीचे नाव लक्ष्मी देवी आणि मेहुणीचे नाव गुडिया आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दीपक हा मूळचा बिहार शरीफचा रहिवासी होता. सासरी असताना लक्ष्मीचे दीपकसोबत कौटुंबिक कारणावरून वाद झाला. यानंतर लक्ष्मी आपल्या माहेरी बाढ येथे आली. गेल्या दोन महिन्यापासून ती माहेरीच राहत होती. दीपकने लक्ष्मीला सासरी येण्याचा आग्रह केला.परंतु, लक्ष्मीने नकार दिला. यामुळे दोघांत वाट पेटला. हा मिटण्याऐवजी इतका पेटला की, दीपकने लक्ष्मीवर गोळ्या झाडल्या. या घटनेत लक्ष्मीचा जागीच मृत्यू झाला. हा आवाज ऐकून लक्ष्मीची बहीण गुडिया तिला वाचवण्यासाठी आली असता दीपकने तिच्यावरही गोळ्या झाडल्या. त्यानंतर दीपकने स्वत:वरही गोळी झाडून आत्महत्या केली.