महाराष्ट्रात पुन्हा मुसळधार
सप्टेंबर महिन्यात पावसाचा जोर कायम राहणार आहे. राज्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार विदर्भ, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात जोरदार पावसाची शक्यता आहे. अमरावती, गडचिरोली आणि वर्धा जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर अकोला, भंडारा, बुलढाणा, गोंदिया, वाशिम या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
कोकणातील रायगड रत्नागिरी जिल्ह्यात यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर मध्य महाराष्ट्रातील, धुळे, जळगाव, नाशिक, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, तर मराठवाड्यातील जालना, परभणी, बीड, हिगोली, लातूर या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
आजपासून पुढील पाच दिवसात काही जिल्ह्यांत जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मुंबईसह संपूर्ण कोकण आणि विदर्भातील १८ जिल्ह्यांमध्ये तसेच नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यांत आणि संपूर्ण मराठवाड्यातील ८ जिल्ह्यांत अतिजोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.