राजकीय

ब्रेकिंग! निवडणूक आयोगाची मोठी कारवाई

  1. लोकसभेनंतर होत असलेल्या विधानसभा निवडणुकीकडे देशाचे लक्ष लागून आहे. यावेळी हरियाणामध्ये काँग्रेस आणि भाजपामध्ये मुख्य लढत पहिला मिळत आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांकडून जोरदार प्रचार करण्यात येत आहे. यातच निवडणूक आयोगाने भाजपावर मोठी कारवाई केली आहे.
    मिळालेल्या माहितीनुसार, निवडणुकीच्या जाहिरातींमध्ये लहान मुलांना दाखवण्यात आल्याने निवडणूक आयोगाने हरियाणा भाजपा अध्यक्षांना नोटीस पाठवली आहे. भाजपा प्रदेशाध्यक्षांकडून आज संध्याकाळी सहा वाजेपर्यंत उत्तर मागवण्यात आल्याची माहिती हरियाणाच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्याने दिली आहे.
    हरियाणा भाजपा अध्यक्षांना पाठवण्यात आलेल्या या नोटीसमध्ये म्हटले आहे की, निवडणूक आयोगाने भाजपाच्या जाहिरातीची दखल घेत हरियाणा भाजपा अध्यक्षांना नोटीस पाठवली आहे आणि त्यांना या प्रकरणात उत्तर देण्यासाठी आज संध्याकाळी सहा वाजेपर्यंत वेळ देण्यात आली आहे. दरम्यान हरियाणामध्ये सर्व 90 जागांसाठी एक ऑक्टोबरला मतदान होणार आहे तर चार ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे.

Related Articles

Back to top button