महाराष्ट्र

ब्रेकिंग! माजी आमदाराच्या गाडीवर दगडफेक

  1. बीडच्या केज मतदारसंघाच्या भाजपच्या माजी आमदार संगीता ठोंबरे यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला आहे. केज तालुक्यातील दहीफळ वडमाऊली गावात ही घटना घडली आहे. ठोंबरे केज तालुक्यातील दहिफळ वड माऊली येथील एका कार्यक्रमासाठी गेल्या होत्या.
  2. कार्यक्रम आटपून संगीता ठोंबरे परत जात असताना त्यांच्या गाडीवर अज्ञातांनी दगडफेक केली आहे. ठोंबरे यांच्यावर उपजिल्हा रुग्णालय केज येथे उपचार सुरू आहेत. 
  3. हा हल्ला नेमका का करण्यात आला? याचा तपास पोलीस करत आहेत. याविषयी अधिक माहिती अशी की, दगडफेकीत गाडीचा ड्रायव्हरच्या बाजूचा काच फुटून तो दगड गाडीचा चालक किशोर बबन मोरे याला लागला. 
  4. त्यानंतर तोच दगड गाडीमध्ये बसलेल्या  ठोंबरे यांना लागला. त्यामुळे त्याही जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर उपजिल्हा रुग्णालय केज येथे उपचार चालू आहेत. दरम्यान याप्रकरणी पोलिसात तक्रार नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान, कोणत्या कारणामुळे ठोंबरे यांच्यावर दगडफेक करण्यात आली हे अद्याप समजू शकलेले नाही.

Related Articles

Back to top button