महाराष्ट्र

चंद्रकांत पाटलांचा कुख्यात गुंडाकडून सत्कार

गेल्या काही वर्षांमध्ये अनेक नेत्याचे गुंडांसोबत फोटो पाहायला मिळाले आहेत. पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारणे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. आता भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनीही मारणेकडून सत्कार स्वीकारला आहे. त्यामुळे पाटलांवरही विरोधकांकडून टीका केली जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, मारणे याआधी पार्थ पवार, निलेश लंके यांची भेट घेतली होती, त्यावेळी मोठी टीका झाली होती.
कोथरूड मधील एका दहीहंडी कार्यक्रमात गुंड गजा याने पाटील याची भेट घेत त्यांना पुष्पगुच्छ भेट देत स्वागत केले. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. यामुळे विरोधक पाटील यांच्यावर टीका करण्याची शक्यता आहे. तर यावर पाटील काय प्रतिक्रिया देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Back to top button