बिजनेस

जिओचा ग्राहकांना आणखी एक दणका?

मागच्या महिन्यात जिओ, व्होडाफोन-आयडिया आणि एअरटेल या टेलकॉम कंपन्यांनी आपल्या इंटरनेटच्या दरात वाढ केली. तसेच मोबाइल रीचार्ज प्लॅन देखील वाढवण्यात आले. यामुळे ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात आपले सीमकार्ड बीएसएनएल या सरकारी टेलकॉम कंपनीमध्ये पोर्ट करून घेतले. अशात ग्राहकांना अजून एक मोठा दणका देणारी बातमी समोर आली आहे. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण म्हणजेच ट्रायने जुने केवळ वॉईस कॉलिंग आणि एसएमएस पॅक पुन्हा लॉन्च करण्याच्या संदर्भात सूचना मागवल्या होत्या. त्यावर आता जिओ, एअरटेल आणि वोडाफोन आयडियाने ट्राय समोर आपले म्हणणे मांडले आहे.
गेल्या काही दिवसांपासून वापरकर्त्यांना अशी भीती वाटते आहे की, त्यांचे आवडते अनलिमिटेड कॉलिंग आणि डेटा टेलीकॉम पॅकेज बंद होतील. अशात दूरसंचार कंपन्या जिओ, एअरटेल आणि वोडाफोन आयडिया यांनी भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणला त्यांच्या अमर्यादित डेटा आणि कॉलिंग प्लॅनमधील संभाव्य बदलांबद्दल उत्तर दिले आहे. आमचे रिचार्ज प्लॅन अशा प्रकारे तयार करण्यात आले आहेत की, वेगळा प्लान खरेदी करण्याची गरज नाही, असे कंपन्यांनी म्हटले आहे.
या दूरसंचार कंपन्यांनी म्हटले की, आमचे टॅरिफ प्लॅन अशा प्रकारे डिझाइन केले आहेत की सर्व युजर्सना समान सुविधा पुरवल्या जातील आणि त्यांना कोणताही वेगळा प्लॅन खरेदी करण्याची गरज नाही.

Related Articles

Back to top button