खेळ

ब्रेकिंग! पाकिस्तानची जगासमोर लाज गेली, डाव घोषित करून शहाणपणा केला आणि…

  • बांगलादेश क्रिकेट संघाने इतिहास रचला आहे. बांगलादेशने कसोटी सामन्यात बलाढ्य पाकिस्तानचा धुव्वा उडवला आहे. रावळपिंडी येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात बांगलादेशने यजमान पाकिस्तानचा दहा विकेट्सनी धुव्वा उडवला.
    या सामन्यात बांगलादेशने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. यानंतर पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना पहिला डाव ६ बाद ४४८ धावांवर घोषित केला. यानंतर संघ दुसऱ्या डावात १४६ धावांवर सर्वबाद झाला. प्रत्युत्तरात बांगलादेशने पहिल्या डावात ५६५ धावा केल्या. दुसऱ्या डावात एकही गडी न गमावता ३० धावा करत सामना जिंकला.
    दुसऱ्या डावात पाकिस्तानची कामगिरी अत्यंत खराब झाली होती. मोहम्मद रिझवानशिवाय एकही फलंदाज चालला नाही. रिझवानने ८० चेंडूत ५१ धावा केल्या. सलामीवीर शफिकने ३७ धावा केल्या. बाबर आझम २२ धावा करून बाद झाला. तर पहिल्या डावातील शतकवीर सौद शकील शून्यावर बाद झाला.
    बांगलादेशने दुसऱ्या डावात एकही विकेट न गमावता सामना जिंकला. त्यांच्याकडून सलामीवीर झाकीर हसनने नाबाद १५ आणि सदमानने नाबाद ९ धावा केल्या. या विजयासह बांगलादेशने दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.

Related Articles

Back to top button