महाराष्ट्र

ब्रेकिंग! राज्यात मोठी खळबळ

राज्यातील विविध भागात अलीकडे गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. दरम्यान, पुण्यात कोयता गँगने सहाय्यक पोलीस निरिक्षकावरच कोयत्याने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कोयता गँगच्या हल्ल्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक गंभीर जखमी झाले आहेत.
रत्नदीप गायकवाड असे हल्ल्यात जखमी झालेल्या सहाय्यक पोलीस निरिक्षकाचे नाव आहे. ही घटना आज रामटेकडी भागात दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास घडली आहे. निहाल सिंग असे हल्ला केलेल्या आरोपीचे नावे आहे.
पुण्यातील रामटेकडी परिसरात कोयता गँगच्या गुंडांना पकडण्यासाठी गायकवाड गेले होते. या गुंडांना पकडत असतानाच त्यांच्यावर कोयता गँगने हल्ला केला आहे. या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे. या हल्ल्यात जखमी झालेल्या गायकवाड यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Related Articles

Back to top button