महाराष्ट्र
ब्रेकिंग! बँकेतील पैसे लगेच काढून घ्या, नाहीतर…

सध्या सोलापूरसह संपूर्ण राज्यात राज्य सरकारच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी पुन्हा एकदा लाडकी बहीण योजनेवरून सरकारवर टीका केली आहे. लाडकी बहीण दीड हजार रुपयांची आहे. बहीण आणि व्यवसाय याचे नात सरकारला कळेलच. मतदान केले नाही तर पैसे परत घेतील. म्हणून पैसे काढून घ्या. सरकारची मानसिकता बरोबर नाही, असा आरोप सुळे यांनी केला आहे. कर्जत जामखेड मतदारसंघामध्ये आमदार रोहित पवारांच्या रक्षाबंधन कार्यक्रमाच्या निमित्ताने 55 हजार महिला उपस्थित होत्या. या कार्यक्रमाला सुळेही आल्या होत्या