राजकीय
मूड ऑफ नेशन ! राज्यातील महायुतीची सत्ता जाणार?

- अलीकडे झालेल्या लोकसभा निवडणुकीनंतर आता राज्यातील सर्वच राजकीय पक्षांना आगामी विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. राजकीय पक्षांनी त्या दृष्टिकोनातून तयारी सुरू केली आहे. दरम्यान, राज्यामध्ये आजघडीला विधानसभा निवडणुका झाल्या तर कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील? कुणाचे सरकार सत्तेत येणार? याचा अंदाज इंडिया टुडे-सी व्होटर्सचा ‘मूड ऑफ नेशन’ सर्व्हेमध्ये समोर आला आहे. या सर्व्हेत महाविकास आघाडीच्या बाजूने जनतेने कौल दिला आहे.
या सर्वेनुसार महाविकास आघाडी 150 ते 160 जागा जिंकू शकते. तर महायुती 120 ते 130 जागा जिंकू शकते, असा अंदाज आहे. मतांची टक्केवारी पाहता महायुतीला 42 टक्के तर महाविकास आघाडीला 44 टक्के मते मिळतील, असा अंदाज आहे. - लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला 43.71 टक्के, तर महायुतीला 43.55 टक्के मते मिळाली. लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीतही महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळेल, असा या सर्व्हेचा अंदाज आहे. शिवाय महाविकास आघाडीला 150 ते 160 जागा मिळाल्या तर राज्यात महाविकास आघाडीची सत्ता येऊ शकते. याशिवाय या सर्व्हेमध्ये केवळ 3.1 टक्के लोकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पसंती दर्शवली आहे.