महाराष्ट्र
ब्रेकिंग! मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण?

राज्यात विधानसभा निवडणुकांची तारीख अद्याप जाहीर झालेली नाही. दिवाळीनंतर या निवडणुका होण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगाने याबाबत कोणतीही घोषणा केलेली नसली तरी सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. सभा, मेळावे, यात्रा, बैठका यामधून सर्व पक्षांची तयारी सुरु आहे. राज्यात यंदा महायुती विरुद्ध महाविकास आघाडी ही मुख्य लढत होणार आहे. दोन्ही आघाड्यांमध्ये तीन प्रमुख पक्ष आहेत.
विधानसभा निवडणुकीपूर्वी किमान चार भिंतीच्या आड तरी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठरवण्यात यावा, अशी ठाकरे गटाची भूमिका आहे. ज्याच्या सर्वाधिक जागा, त्याचा मुख्यमंत्री हे सूत्र मान्य नसल्याचे ठाकरेंनी यापूर्वीच एका सार्वजनिक सभेत म्हटले आहे. यामुळे एकमेकांच्या जागा पाडल्या जातील, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली होती.
महाविकास आघाडीच्या अलीकडे झालेल्या मेळाव्यात मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करण्याची मागणी ठाकरे यांनी केली होती.
दरम्यान ठाकरेंच्या मागणीला ज्येष्ठ नेते शरद पवारांनी प्रतिसाद दिला नाही. त्यांनी महायुतीची सत्ता उलथवून लावायची आहे, असे आवाहन केले. तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी आधी निवडणूक जिंकू नंतर मुख्यमंत्री कोण? ते ठरवू, अशी जाहीर भूमिका मांडली. राष्ट्रवादी पवार गट आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी मेळाव्यातील मागणीला प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर आता किमान चार भिंतीच्या आत तरी मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार ठरवावा, अशी भूमिका ठाकरे गटाने मांडली आहे