राजकीय

भाजपला मोठा धक्का; दोन बडे नेते शरद पवारांच्या संपर्कात

  • अलीकडे झालेल्या लोकसभा निवडणुकीनंतर आता राज्यातील सर्वच राजकीय पक्षांना आगामी विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. राजकीय पक्षांनी त्या दृष्टिकोनातून तयारी सुरू केली आहे. दरम्यान, ज्येष्ठ नेते शरद पवार मोठी खेळी खेळण्याच्या तयारीत आहेत. कोल्हापूरच्या कागलमधील भाजपा नेते समरजित घाटगे शरद पवार गटाच्या वाटेवर असल्याची माहिती आहे. समरजित हे महाविकास आघाडीकडून कागलमध्ये विधानसभा निवडणूक लढण्यास इच्छुक असल्याची माहिती मिळत आहे. घाटगे यांच्या उमेदवारीमुळे महायुतीसह मंत्री हसन मुश्रीफ यांचे टेन्शन वाढण्याची शक्यता आहे.
    सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राज्यातील सर्व नेत्यांनी विविध मतदारसंघात चाचपणी सुरु केली आहे. दुसरीकडे महायुतीमध्ये अजितदादा पवार गटाकडून कोल्हापूरच्या कागल मतदारसंघातून राष्ट्रवादीचे संभाव्य उमेदवार मुश्रीफ असल्याने समरजीत यांची नाराजी उघड झाली आहे.
    मुश्रीफ यांच्या संभाव्य उमेदवारीमुळे समरजित हे शरद पवार गटाकडून निवडणूक लढवणार असल्याची घोषणा करणार असल्याचे बोलले जात आहे. यासाठी समरजीत हे कार्यकर्त्यांचा मेळावा घेणार आहेत. तसेच पुणे जिल्ह्यातील इंदापूरचे भाजप नेते, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे देखील पवार गटाच्या संपर्कात आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

Related Articles

Back to top button