क्राईम

ब्रेकिंग! राज्यात बदलापूर घटनेची पुनरावृत्ती

राज्यात बदलापूर येथे एका शाळेत सफाई कर्मचाऱ्याने दोन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याच्या घटनेमुळे काल मोठा जनक्षोभ पाहायला मिळाला. आंदोलकांनी मोठ्या प्रमाणात दगडफेक करत तोडफोड केली. ही घटना ताजी असतांना अकोल्यातील बाळापुर तालुक्यातील काजीखेड येथे जिल्हा परिषदेच्या उच्च माध्यमिक शाळेत एका शिक्षकाने सहा मुलींचा लैंगिक छळ केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या नराधम शिक्षकाने अश्लील व्हिडीओ दाखवून त्यांच्या छळ केल्याचे उघड झाले असून काल संध्याकाळी हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रमोद सरदार असे आरोपी शिक्षकाचे नाव असून त्याच्यावर काल संध्याकाळी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या चार महिन्यांपासून प्रमोद हा शिक्षक आठवीच्या मुलींना अश्लिल व्हिडिओ दाखवून त्यांचा छळ करत होत. तसेच त्यांना व्हिडिओ दाखवून त्यांना चुकीच्या पद्धतीने स्पर्श करत होता, तर त्यांच्यासोबत अश्लिल बोलतही होता. ही बाब पीडित मुलींनी घरी सांगितल्यावर हा प्रकार उघडकीस आला. या प्रकारामुळे पालक हादरले. त्यांनी थेट उरळ पोलिस ठाण्यात जात नराधम शिक्षकाविरोधात तक्रार दिली. पोलिसांनी देखील या घटनेची गांभीर्याने दाखल घेऊन सहा मुलींचा जबाब नोंदवत गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान शिक्षकाला पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेमुळे संताप व्यक्त केला जात आहे.

Related Articles

Back to top button