क्राईम

ब्रेकिंग! चिमुरडी अत्याचार प्रकरणात धक्कादायक बातमी

बदलापूर अत्याचार प्रकरणाचे पडसाद राज्यभर उमटत आहेत. या प्रकरणी संतप्त बदलापूरकरांनी रेल रोको आंदोलन केले आहे. सर्वच स्तरातून या प्रकरणी संतप्त प्रतिक्रिया समोर येत आहे. या प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याच्याबाबतीत एक मोठी माहिती समोर येत आहे. या आरोपीकडेच लहान मुलींना वॉशरुमला घेऊन जाण्याची जबाबदारी होती. या नराधमाने याच गोष्टीचा गैरफायदा घेऊन, या चिमुरड्या मुलींवर लैंगिक अत्याचार केला. 
आरोपी अक्षय शिंदे याचे वय 24 वर्षे आहे. त्याला सफाईसाठी नेमलेल्या कंपनीने या शाळेत कामावर ठेवलं होतं. आरोपी अक्षय हा एक ऑगस्टला शाळेत कामावर लागला होता. अक्षय हा सफाई कर्मचारी होता. 
अक्षयने 12 तारखेला एका मुलीचा विनयभंग केला. त्यानंतर त्याने चार वर्षांच्या मुलीवर अत्याचार केले. पीडित मुलीने प्रायव्हेट पार्टमध्ये दुखत असल्याचे घरच्यांना सांगितले. 
अक्षय शिंदेकडे मुलींना वॉशरुमला नेण्याची जबाबदारी होती. शाळेने स्वच्छतागृहांच्या साफ सफाईसाठी महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या आरोपीने याच गोष्टीचा फायदा घेतला आहे. यानंतर पालकांनी तत्काळ पोलीस स्टेशन गाठले. मात्र रात्री 12 वाजेपर्यंत पोलिसांनी पालकांना बसवून ठेवले. मनसेने याबाबत आवाज उठवायला सुरुवात केल्यानंतर पोलिसांनी तक्रार दाखल केली. यानंतरही पोलिसांनी पाहिजे तसा तपास केला नाही, असा आरोप केला जात आहे.

Related Articles

Back to top button