क्राईम

बिग ब्रेकिंग! चिमुरडी अत्याचार प्रकरणात नवा ट्विस्ट

  1. बदलापूर पूर्व येथील एका नामांकित शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर अत्याचार घडल्याची धक्कादायक घटना घडली. ही घटना 12 ऑगस्ट रोजी घडली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यासाठी पालकांना संघर्ष करावा लागला. यामुळे बदलापूरच्या नागरिकांनी आज आक्रमक भूमिका घेत सकाळपासून रेल्वे स्टेशनवर आंदोलन सुरु केले आहे. पोलिसांनी नागरिकांना रेल्वे रुळांवरुन बाजूला होण्याचे आवाहन केले.
    दरम्यान शाळकरी मुलींसोबत झालेल्या अत्याचार प्रकरणावर राज्य सरकारकडून पावले उचलण्यात आली आहेत. गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ करणाऱ्या पोलिसांविरोधात गृहमंत्रालयाकडून कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करत याबाबतची माहिती दिली आहे. तीन बड्या पोलिस अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. याआधी एका पोलिस अधिकाऱ्याची बदली झाली होती. बदलापूर अत्याचार प्रकरणात आतापर्यंत चार पोलिसांवर कारवाई कऱण्यात आली आहे. त्याशिवाया ज्या शाळेत ही घटना घडली, तेथील दोन जणांवर कारवाई केली आहे.
    फडणवीस यांनी ट्वीट करत कारवाई केल्याची माहिती दिली आहे. त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले की, बदलापूरच्या घटनेत प्रारंभीच्या काळात कारवाईत विलंब करणारे बदलापूर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक आणि हेडकॉन्स्टेबल यांना तत्काळ निलंबित करण्याचे आदेश ठाणे पोलिस आयुक्तांना दिले आहेत.

Related Articles

Back to top button