क्राईम

ब्रेकिंग! घटनेतील आरोपी भेटला तर रस्त्यात ठेचा

अलीकडे महिला अत्याचाराच्या अनेक घटना समोर येत असून आता बदलापूर शहरातून देखील एक धक्कादायक घटना समोर येत आहे. बदलापूर पूर्वेतील एका नामांकित शाळेतील चार वर्षांच्या दोन मुलींवर शाळेतील सफाई कर्मचाऱ्याने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक बाब काही दिवसांपूर्वीच उघडकीस आली आहे. यावरून शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, बदलापूर येथील घटनेत अत्याचार करणाऱ्यांना रस्त्यावर चिरडून मारलं पाहजे. कायदा गेला उडत. सरकार कारवाई करेल मात्र एक निर्णय घेण्याची गरज आहे. महिलेवर अत्याचार होत असेल तर जरब बसला पाहिजे.आता सहन शिलतेचा अंत झाला पाहिजे. या घटनेला कुणी राजकारण करू नका, मात्र यासाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजे. नराधमाला ठेचायची वेळ आली, तर सुरुवात आमच्यापासून होईल. आरोपी भेटला तर त्याला रस्त्यात ठेचा. 

यासाठी कायदा हातात घेतला तरी चालेल. सरकार काम करत आहे. लिंगपिसाट लोकांवर कठोर कारवाई झाली पाहिजे. यांची हयगय केली जोणार नाही. अशा लोकांना पायबंद घातला पाहिजे. पोलिसांचा धाक निर्माण झाला पाहिजे. यांना आज मोकळे सोडले तर महाराष्ट्र्रात अशांतता निर्माण होईल. चोरी, डाके टाकणाऱ्यांना सोडून अश्या लोकांना धडा शिकवा, असे ते म्हणाले.

Related Articles

Back to top button