महाराष्ट्र

ब्रेकिंग! राज्यात पुन्हा क्रुरतेचा कळस

राज्यात मुलींवर लैंगिक अत्याचाराचे प्रमाण वाढताना दिसत आहे. बदलापूर येथील घटना ताजीच असताना आता नाशिक जिल्ह्यातही अशाच एका प्रकाराची पुनरावृत्ती झाल्याचे समोर येत आहे. घरासमोर खेळत असलेल्या साडेचार वर्षीय चिमुकलीचे एका नराधमाने अपहरण केले. त्यानंतर निर्जनस्थळी नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. या घटनेने संतापाची लाट उसळली असून याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पीडित चिमुकली ही सिन्नर तालुक्यातील एका गावातील रहिवासी आहे. काल दुपारच्या सुमारास ती घरासमोर खेळत होती. दरम्यान गावातीलच एका व्यक्तीने तिचे अपहरण करून तिला निर्जनस्थळी नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. बराच वेळ होऊनही चिमुकली घरी न आल्याने कुटुंबियांनी तिचा शोधा घेतला असता तेव्हा संशयित आरोपी हा चिमुकलीसोबतच होता. मात्र पीडितेच्या कुटुंबियांना पाहून तो पळून गेला.
यावेळी चिमुकली रडताना दिसून आली. तेव्हा चिमुकलीवर अत्याचार झाल्याचा संशय कुटुंबियांना आला. त्यांनी तातडीने पोलिसांत धाव घेऊन तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली आहे.

Related Articles

Back to top button