महाराष्ट्र पुन्हा हादरला! आधी तरुणीचा जीव घेतला, आता कुटुंबियांना धमकी

बदलापूरमध्ये चार वर्षांच्या दोन शाळकरी मुलींवर झालेल्या अत्याचार प्रकरणी विरोधक आक्रमक झाले आहेत. बदलापूरकरांनी काल दिवसभर शहर बंद पाळला, रेल रोको देखील केला. सोलापुरातही या घटनेबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे. दरम्यान, छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथे एका सोळा वर्षीय मुलीने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणात तरुण मुलीला त्रास देत असल्याची माहिती आहे. तरुणाकडून दिल्या जाणाऱ्या धमकीमुळे मुलीने टोकाचे पाऊल उचलले आहे. धक्कादायक बाब म्हणजे ‘आज जेल, कल बेल, फिर वही पुराना खेल’ अशी धमकी आरोपीच्या भावाकडून पीडितेच्या कुटुंबीयांना दिली जात आहे. आरोपींच्या कुटुंबीयांची ही मुजोरी पाहून संताप व्यक्त केला जात आहे.
पूजा शिवराज पवार (16) असे मृत तरुणीचे नाव आहे. तू माझ्याशी बोलली नाहीस, तर तुझ्या भावाला जीवे मारून टाकीन, अशी धमकी पूजाला दिली जात होती. त्यामुळे रोजच्या त्रासाला कंटाळून पूजाने टोकाच पाऊल उचलले असल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे.
जो तरुण पूजाला त्रास देत होता, त्याचे नाव कासीम पठाण असे आहे. कासीमसह एकूण सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.