ब्रेकिंग! पोलिस पुत्राचा खून

राज्यातील विविध भागात अलीकडे गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यामुळे संताप व्यक्त होत आहे. दरम्यान, नाशिक शहरात आज पहाटे पाच वाजेच्या सुमारास एक खळबळजनक घटना घडली. एका सेवानिवृत्त पोलिसाच्या मुलाची भररस्त्यात हत्या करण्यात आली. शहरातील पंचवटी परिसरात असलेल्या सीआयडी ऑफिस समोरच ही घटना घडली. गगन प्रवीण कोकाटे (वय 25) असे मृत तरुणाचे नाव आहे. हत्येनंतर आरोपी फरार झाले असून पोलिसांनी त्यांच्या शोधासाठी वेगवेगळी पथके रवाना केली आहेत. आर्थिक देवाण घेवाणीतून ही हत्या झाली असावी, असा पोलिसांना संशय आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गगन हा सेवानिवृत्त पोलीस अधिकारी प्रवीण कोकाटे यांचा मुलगा होता.
आज पहाटे तो पंचवटी परिसरात फिरण्यासाठी गेला. यावेळी अज्ञात व्यक्तींनी आरोपींनी दिंडोरी रोडवरील मेरी वसाहतीच्या पंजाबराव देशमुख वसतिगृहासमोर गगनची वाट अडवली. यावेळी आरोपी आणि गगन यांच्यात बाचाबाची झाली. वाद इतका विकोपाला गेला, की आरोपींनी भररस्त्यात गगनची हत्या केली. हत्येनंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले.