सोलापूर

सोलापूर ब्रेकिंग! तरुणास मिरवणुकीत मारहाण

सोलापूर (प्रतिनिधी) मार्कंडेय रथ उत्सव मिरवणुकीमध्ये नाचण्यासाठी गेल्यानंतर फिर्यादी आशिष मनोज राठोड (वय-२०,रा.शिवशक्ती चौक,कलावती नगर,अक्कलकोट रोड) याला हाताने मारहाण करत डोक्यात दगड घालून दुखापत केली आहे.ही घटना १९ ऑगस्ट रोजी पोटफाळी चौक येथे घडली.
याप्रकरणी आशिष राठोड याने जेलरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून,त्याच्या फिर्यादीवरून आनंद धोत्रे,सतीश धोत्रे,विशाल भैरामंडी (सर्व रा.सोलापूर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल कांबळे हे करीत आहेत.

Related Articles

Back to top button