राजकीय

ठाकरेंनंतर शिंदेंचा मोठा डाव

  • आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शिंदे गटाकडून जोरदार तयारी सुरू आहे. शिंदे गटाने निवडणुकीच्या रिंगणामध्ये कोणाला उतरावायचे यासाठी चाचपणी सुरू केली आहे. अशामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे माजी खासगी सचिव बालाजी खतगावकर हे विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे यांनी आपले खासगी सचिव मिलिंद नार्वेकर यांना विधानपरिषदेचे आमदार केले. त्यांच्यानंतर आता शिंदे देखील आपले खासगी सचिव खतगावकर यांना विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवून आमदार बनवण्यासाठी प्रयत्न करत आहेत, अशी चर्चा आता रंगू लागली आहे.
    खतगावकर हे शिंदे यांच्याकडे खासगी सचिव म्हणून कार्यरत होते. दोन महिन्यांपूर्वीच खतगावकर यांनी पदाचा राजीनामा दिला. नांदेडच्या मुखेड मतदारसंघात खतगावकर यांनी आपल्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन केले. या कार्यालयाच्या उद्घाटनाला मंत्री शंभुराजे देसाई हे उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांच्या कामांशी प्रभावित होऊन खतगावकर समाजकारणात उतरत असल्याची चर्चा आहे. खतगावकर यांनी राजकीय प्रवासाची सुरूवात जरी केली असली तरी मतदारसंघ अद्याप निश्चित नाही.

Related Articles

Back to top button