महाराष्ट्र

सत्तेत येण्याआधीच आदित्य ठाकरे यांची मोठी घोषणा

सध्या सोलापूरसह संपूर्ण राज्यात राज्य सरकारच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान, या योजनेच्या नावाखाली सरकार महिलांची दिशाभूल करत आहे. तसेच विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे सरकारने हा निर्णय घेतल्याचे महाविकास आघाडीचे म्हणणे आहे. दरम्यान, लाडकी बहीण योजनेचे पैसे महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली असता ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरेंनी आमचे सरकार आल्यावर लाडकी बहीण योजनेत रक्कम वाढवू, असे आश्वासन दिले आहे.
महायुती सरकारने अनेक योजना जाहीर केल्या. जाहिराती येतात. पण पुढे काही होत नाही. महाविकास आघाडीचे सरकार येताच लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना मिळणारी रक्कम वाढवली जाईल, असे आदित्य म्हणाले.

Related Articles

Back to top button