महाराष्ट्र

लाडकी बहीण योजनेत मोठी अपडेट

सध्या सोलापूरसह संपूर्ण राज्यात राज्य सरकारच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान, या अंतर्गत एक कोटी महिलांच्या खात्यात तीन हजार रुपये टाकले असून लवकरच आणखी एक कोटी महिलांनाही रक्कम मिळणार असल्याची मोठी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली.
महिला सशक्तीकरण अभियाना अंतर्गत कार्यक्रमात सातारा येथे ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महिला बालकल्याण मंत्री अदिती तटकरे आदींची उपस्थिती होती.
फडणवीस म्हणाले, मुख्यमंत्री शिंदेंच्या नैतृत्वात महिला धोरणांची सुरुवात आपण केली आहे. एसटी अर्ध्या तिकीटात केली. अर्ध्या तिकीटामुळे महिला पतीला घरी बसवून त्या महत्वाची कामे करत आहेत. त्यामुळे आता त्या धाडसीही होत आहेत. उद्या रक्षाबंधनाचा कार्यक्रम आहे, त्यामुळे भाऊ ओवाळणी टाकतीलच. पण हे तुमचे राज्यकर्ते भाऊ दर महिन्याला तुम्हाला ओवाळणी टाकणार आहेत. यात अजिबात खंड पडणार नाही.

Related Articles

Back to top button