सोलापूर

सोलापूर! सुशीलकुमार शिंदे, विजयदादा कमाल करणार

  1. लोकसभा निवडणुकीत सोलापूर जिल्ह्यात ज्येष्ठ नेते शरद पवार, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे आणि विजयसिंह मोहिते पाटील या तीन नेत्यांचे सुत पुन्हा जुळले. यामुळे जिल्ह्यातील माढा आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघावर महाविकास आघाडीने मोठा विजय मिळवला. त्यामुळे आगामी विधानसभा मतदारसंघाची सर्व सूत्रे आता मोहिते पाटील कुटुंबीयांकडे सोपविण्यात आल्याची माहिती समोर आली. आगामी विधानसभेच्या निवडणुकीत उमेदवारांची निवड मोहिते पाटील यांच्याच सल्ल्यानेच होणार, असे खासदार सुप्रिया सुळे यांनीच स्पष्ट केले आहे.
    सोलापूर लोकसभा मतदारसंघात मोहोळ, सोलापूर शहर उत्तर, सोलापूर शहर मध्य, अक्कलकोट, सोलापूर दक्षिण,  पंढरपूर हे मतदारसंघ येतात. तर करमाळा, माढा, सांगोला, माळशिरस, फलटण, माण हे विधानसभा मतदारसंघात माढा लोकसभा मतदारसंघात येतात. आता दोन्ही लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे खासदार आहेत. या सर्व भागात पवार, शिंदे, विजयदादा यांचे वर्चस्व राहिले आहे. त्यामुळे हे तिन्ही नेत्यांनी सर्वच मतदारसंघावर लक्ष केंद्रीत केले आहे.
    मोदी लाट असताना २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मोहिते -पाटील कुटुंबीयांनी पवार यांची साथ सोडून थेट भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. तिथे विजयसिंह मोहिते -पाटील यांचे पुत्र रणजितसिंह यांना विधानपरिषदेवर सामावून घेण्यात आले होते.
    नंतर काही दिवसांतच त्या पक्षातही मोहिते -पाटील कुटुंबीयांची घुसमट होऊ घातली. मागील विधानसभा निवडणुकीत भाजपने मोहिते -पाटील यांना विश्वासात न घेता त्यांच्या घरच्या माळशिरस राखीव जागेवर संघ परिवारातील राम सातपुते यांना शेवटच्या क्षणी आयात करून त्यांच्या आमदारीकीची जबाबदारी सोपवली होती. त्यांचा या निवडणुकीत पराभव केला. आता जिल्ह्यातील सर्व सूत्रे मोहिते -पाटलांच्या हाती दिल्याने महाविकास आघाडीला मोठे बळ मिळण्याची शक्यता आहे.

Related Articles

Back to top button