देश - विदेश

ब्रेकिंग! महिलांवर अत्याचार करणा-या गुन्हेगारांना फाशीची शिक्षा?

आपल्या माता, बहिणी आणि मुलींवर होत असलेल्या अत्याचारांचा समाज म्हणून विचार करायला हवा. राज्य सरकारांना याचा गांभीर्याने विचार करावा लागेल. महिलांवर अत्याचार करणा-या गुन्हेगारांना फाशीची शिक्षा होऊन या शिक्षेचीही व्यापक चर्चा झालीच पाहिजे. जेणेकरून या प्रवृत्तीच्या नराधमांच्या मनात भीती निर्माण होईल, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. 
आज स्वातंत्र्यदिनी मोदी यांनी लाल किल्ल्यावरुन ध्वजारोहण केले. त्यानंतर देशाला संबोधित करताना बोलत होते.
मागील दहा वर्षांमध्ये जवळपास दहा कोटी महिलांनी स्वयंसहायता गटात सहभागी होत या महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होत आहेत. ज्यावेळी महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होतात ज्यावेळी त्या निर्णय घेणाऱ्या व्यवस्थेचा भाग होतात. कुटुंबाला पुढं नेणाऱ्या या बदलांचा हातभाग सामाजिक बदलांमध्येही दिसून येतो, असे म्हणत पंतप्रधनांनी देशातील महिला वर्गाची प्रगती अधोरेखित केली, असे मोदी म्हणाले.

Related Articles

Back to top button