महाराष्ट्र

खुशखबर! लाडकी बहीण योजनेचा अर्ज दाखल करण्यास मुदतवाढ

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा अर्ज दाखल करण्याची 31 ऑगस्ट ही अंतिम तारीख असेल, अशी घोषणा राज्य सरकारकडून करण्यात आली आहे. परंतु, आता या योजनेबाबत एक महत्त्वाची घोषणा महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी केली आहे.
त्यांनी काल राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व महिला व बालविकास अधिकारी यांच्याशी दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे आढावा घेतला. या आढावा बैठकीनंतर त्यांच्याकडून महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे. या बैठकीनंतर मंत्री तटकरे म्हणाल्या की, मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेसाठी 31 ऑगस्टपर्यंतची मुदत ही अंतिम नसून अर्जाची प्रक्रिया निरंतर चालणार आहे. 31 ऑगस्टनंतर आलेल्या पात्र लाभार्थ्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे. 
या योजनेतील पात्र महिलांना 17 ऑगस्ट रोजी त्यांच्या खात्यात पैसे जमा करण्यात येणार आहेत. आतापर्यंत जवळपास एक कोटी 35 महिला पात्र ठरल्या असून त्यांच्या खात्यात 17 ऑगस्ट रोजी पैसे जमा होणार आहेत. ज्यांची बँक खाती आधार कार्डशी लिंक नाहीत, त्यांची खाती लिंक करून झाल्यानंतर बँक खात्यात पैसे जमा होतील, अशी माहिती तटकरे यांनी दिली.

Related Articles

Back to top button