राजकीय
ब्रेकिंग! शरद पवारांसोबत पुन्हा जाणार का?

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फुट पडल्यानंतर अजितदादा पवार हे महायुतीबरोबर सत्तेत सहभागी झाले. लोकसभा निवडणुकीत अजितदादा गटाचा पराभव झाल्याने आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अजितदादा हे जेष्ठ नेते शरद पवार गटात जाणार का? याची चर्चा राज्याच्या राजकारणात सुरू आहे. यावर आता अजितदादा पवारांनी भाष्य केले.
अजितदादा पवार यांनी एक मुलाखत दिली. या मुलाखतीत अजितदादा यांनी अनेक विषयांवर भाष्य केले. दरम्यान, शरद पवारांसोबत पुन्हा जाणार का? असा प्रश्न त्यांना विचारला असता त्यांनी ‘नो कमेंट’ असे उत्तर दिले.
अजितदादा म्हणाले, नो कॉमेंट्स… मी आता महायुतीचा प्रचार करत आहे. मी बजेटमध्ये चांगल्या योजना आणल्या आहेत. त्याबाबत आम्ही लोकांना सांगत आहोत. आम्ही विकास करत आहोत. आम्ही आतापर्यंत काय काय काम केले, कोणत्या मतदारसंघात काय केले, याची माहिती लोकांना देत आहोत.