देश - विदेश
स्वातंत्र्य दिनी मोठी खुशखबर! मोदींच्या स्वप्नांना बळ

नरेंद्र मोदी यांनी आपल्या तिसऱ्या कार्यकाळात पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर, देशाला तिसरी अर्थव्यवस्था बनवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.
मोदी सरकारचा हा कार्यकाळ २०२९ पर्यंत चालणार आहे. अशातच आता आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून (आयएमएफ) २०२९ पर्यंत भारत तिसरी अर्थव्यवस्था बनेल, असे सांगण्यात आले आहे. सध्याच्या घडीला भारत हा जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे.
जगातील पहिल्या चार अर्थव्यवस्थांमध्ये अमेरिका, चीन, जर्मनी आणि जपान हे देश आहेत. तर येत्या पाच वर्षात भारत जर्मनी आणि जपान या देशांना पछाडत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल, असे आयएमएफने म्हटले आहे.
तेव्हा २०२९ मध्ये भारतीय अर्थव्यवस्था ही 6.44 ट्रिलियन डॉलर मूल्याची असणार आहे. तर जर्मनीची अर्थव्यवस्था ही 5.36 ट्रिलियन डॉलर आणि जपानची अर्थव्यवस्था ही 4.94 ट्रिलियन डॉलर असणार आहे. भारत सध्या सर्वाधिक वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून समोर आला आहे, असेही आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने म्हटले आहे.