ब्रेकिंग! हिंसक जमावामुळे बांगलादेशातील परिस्थिती आणखी बिघडली
बांगलादेशात हिंसाचाराने रोद्ररूप धारण केले आहे. अनेकांची घर पेटून दिली जात आहेत. त्यामध्ये आता समोर आलेल्या बातमीनुसार बांगलादेश क्रिकेट संघाचा माजी कर्णधार मश्रफी मुर्तझा याच्या घराला आंदोलकांनी आग लावली. देशात सध्या सुरू असलेल्या अराजकतेच्या पार्श्वभूमीवर पोलीस आणि सुरक्षा दलांकडून विद्यार्थ्यांना ताब्यात घेऊन गोळ्या घातल्या जात आहेत.
आंदोलकांनी सत्ताधारी अवामी लीग पक्षाचे खासदार मुर्तझा यांच्यावर बांगलादेशातील ‘विद्यार्थ्यांचे हत्याकांड आणि सामूहिक अटक’ यावर मौन बाळगल्याबद्दल संताप व्यक्त केला. यावेळी जिल्हा अवामी लीगचे कार्यालय आणि पक्षाचे अध्यक्ष सुभाषचंद्र बोस यांचे निवासस्थानही जमावाने जाळले. मोर्तझाने 117 सामन्यांमध्ये बांगलादेशचे कर्णधारपद भूषवले आहे. सध्या बांगलादेश येथील परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत आहे. याशिवाय हिंसक आंदोलनामुळे चिंता व्यक्त होत आहे. सध्या बांगलादेशातील हिंदू मंदिरे, हिंदू महिला आणि नेत्यांना टार्गेट केले जात आहे. विविध मंदिरांमध्ये जाऊन नासधूस करण्यात आली आहे. या संपूर्ण पार्श्वभूमीवर बांगलादेश लष्करांकडून हिंदू अल्पसंख्यांक, मंदिरे आणि इतर समाजाच्या मदतीसाठी हेल्पलाइन क्रमांक जारी केले आहेत.