राजकीय
दिल्लीच्या राजकारणात जाणार की महाराष्ट्रात?
भाजपाचे सध्याचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांची केंद्रिय मंत्रिमंडळात निवड झाल्याने भाजपा त्यांना पक्षाच्या जबाबदारीतून मुक्त करणार आहे. अशा स्थितीत पक्षाचा नवा अध्यक्ष कोण होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या पदासाठी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव आघाडीवर आहे. याच पार्श्वभूमीवर फडणवीस यांना दिल्लीच्या राजकारणात जाणार की महाराष्ट्रात? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर त्यांनी एका वाक्यात उत्तर दिले.
फडणवीस म्हणाले की, राजकारण हा अनिश्चितेतचा निश्चित खेळ आहे. त्यामुळे राजकारणात उद्या काय घडेल, हे सांगता येत नाही. मात्र. तुम्ही जो प्रश्न ज्या अनुषंगाने विचारलात त्यांचे उत्तर मी एकाच वाक्यात देईन. मी येथेच आहे. म्हणजेच फडणवीस हे कुठेही जाणार नाही, हे आता स्पष्ट झाले आहे.