ब्रेकिंग! विधानसभा निवडणुका ठाकरे गट ‘या’ चिन्हावर लढणार ?

Admin
1 Min Read
शिवसेना पक्ष फुटीनंतर शिवसेना पक्ष नाव आणि निवडणूक चिन्ह हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मशाल चिन्हावर चिन्हावर लोकसभेची निवडणूक लढली. आता राज्यात ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात विधानसभेची निवडणूक होऊ घातली आहे. विधानसभेची निवडणूक मशाल चिन्हावरच लढणार, असे उद्धव यांनी मुंबईत झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात जाहीर केले आहे.
लोकसभा निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाला मशाल चिन्ह तर राष्ट्रवादी शरद पवार गटाला तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह दिले होते. परंतु या चिन्हांशी साधर्म्य असलेल्या इतर अपक्ष उमेदवारांनी भरघोस मत घेतली. याचा फटका ठाकरे आणि पवारांना बसला. यातच आता विधानसभा निवडणुकीसाठी मशाल आणि तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हाशी साधर्म्य असलेले चिन्हे वगळण्याची मागणी दोन्ही गटाने निवडणूक आयोगाकडे केली आहे.
यातच आम्ही तयार केलेल्या मशालीच्या चिन्हाला मान्यता देण्यात यावी, अशी विनंती उद्धव यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे. यासंदर्भात ठाकरे गटाकडून निवडणूक आयोगाला एक पत्र देखील पाठवण्यात आले आहे. या पत्राच्या उत्तराची ठाकरे गटाला प्रतिक्षा आहे.
Share This Article