अगं बाई अरेच्चा…लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होणार एकच रुपया
राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजना घोषित केली. येत्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. या योजनेसह आणखी काही योजनांची देखील घोषणा करण्यात आली आहे. लाडकी बहीण योजने अंतर्गत महिलांना दरमहा दीड हजार रुपये दिले जाणार आहेत. यासाठी राज्यात मोठ्या प्रमाणात नोंदणीदेखील झाली. मात्र, दीड हजार रुपयांऐवजी केवळ एक रुपयाच महिलांच्या खात्यात जमा होणार आहे. याबाबत महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी माहिती दिली आहे. त्या म्हणाल्या, तांत्रिक तपासणीसाठी सरकार येत्या काही दिवसांत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या काही लाभार्थ्यांच्या खात्यात एक रुपया पाठवणार आहे.
तटकरे म्हणाल्या, आम्ही काही लाभार्थ्यांच्या खात्यात एक रुपया हस्तांतरित करून योजनेसाठी तांत्रिक तपासणी करत आहोत. कृपया योजनेतील स्टायपेंडमध्ये याचा गोंधळ घालू नका आणि गैरसमजांना बळी पडू नका, असे आवाहन त्यांनी केले.