ब्रेकिंग! जम्मू-काश्मीरमध्ये चार अतिरेकी ठार

Admin
1 Min Read
  1. जम्मू-काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात काल झालेल्या चकमकीत चार दहशतवादी ठार झाले. या चकमकीत दोन जवान शहीद झाले. यात अकोला येथील मोरगाव भाकरे गावातील भारतीय सैन्य दलातील जवान प्रवीण जंजाळ हे दहशतवाद्यांशी लढताना शहीद झाले. 
  2. त्यांचे पार्थिव विशेष विमानाने आज कुटुंबीयांना दिले जाणार आहे. प्रवीण हे शहीद झाल्याची माहिती मिळताच त्यांच्या मोरगाव भाकरे या गावावर शोककळा पसरली आहे. काल जम्मू काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यात दोन ठिकाणी लष्कर आणि दहशतवाद्यामध्ये चकमक झाली. 
  3. अधिकाऱ्यांनी सांगितले की, कुलगामच्या फ्रिसल चिन्निगाम भागात घेराबंदी आणि शोध मोहीम सुरू असताना दहशतवाद्यांशी चकमक झाली. आणखी चार दहशतवादी लपून बसल्याचा संशय आहे.
  4. लष्करी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार चकमकीत आतापर्यंत चार दहशतवादी मारले गेले आहेत. 
  5. घटनेच्या ठिकाणी ड्रोन फुटेजमध्ये चार मृतदेह पडलेले दिसले, परंतु अद्यापही गोळीबार सुरू असल्याने मृतदेह बाहेर काढण्यात आलेले नाहीत. 
  6. दरम्यान प्रवीण जंजाळ हे २०१९ मध्ये लष्करात दाखल झाले होते. त्यांच्या लग्नाला एक वर्ष झाले असून त्यांच्या मागे पत्नी, आई-वडील, मोठा भाऊ असा परिवार आहे.
Share This Article