रोहित शर्माने गर्दीच्या दिशेने पाहून वर्ल्डकप उंचावला अन्…
विश्वविजेता टीम इंडिया आज दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचली. याआधी भारतीय खेळाडू खराब हवामानामुळे बार्बाडोसमध्ये अडकून पडले होते. यापूर्वी ठरलेल्या वेळापत्रकानुसार भारतीय खेळाडू सोमवारी न्यूयॉर्कला पोहोचणार होते, मात्र खराब हवामानामुळे ते शक्य झाले नाही.
पण आज रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाचे खेळाडू चार्टर विमानाने भारतात पोहोचले आहेत. टीम इंडियाच्या स्वागतासाठी विमानतळावर चाहत्यांची मोठी गर्दी झाली होती.
भारतीय क्रिकेट संघ T20 विश्वचषक ट्रॉफीसह सकाळी इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरला. बाहेर चाहत्यांची मोठी गर्दी होती. चॅम्पियन संघ आणि ट्रॉफीची झलक पाहण्यासाठी प्रत्येकजण आतुर झाला होता. सर्व चाहते आनंदाने भरून आले. चाहते भारत माता की जयच्या घोषणा देत होते. तसेच त्यांच्या हातात तिरंगा होता. यावेळी विमानतळावरुन बाहेर पडताना रोहितने चाहत्यांच्या दिशेने पाहून विश्वचषक ट्रॉफी उंचावून दाखवला.