क्राईम

भारीच! आता कॉल करणाऱ्याचे नाव मोबाईलवर दिसणार

अनोळखी नंबरवरून स्मार्टफोनवर कॉल आला की, फोन करणारा कोण आहे? हा पहिला प्रश्न मनात येतो. मात्र आता ही समस्या संपणार आहे. लवकरच अनोळखी नंबरवरून कॉल आल्यावर कॉल करणाऱ्याचे नावदेखील दिसणार आहे. आता कॉलिंग नेम प्रेझेंटेशन (सीएनपी) नावाची ही सुविधा १५ जुलैपासून देशभरात →सुरू होणार आहे. यामध्ये सिम खरेदी करताना केवायसी फॉर्ममध्ये भरलेल्या माहितीच्या आधारे कॉलरचे नाव प्रदर्शित केले जाणार आहे.
स्पॅम, फसवणूक कॉल आणि सायबर गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी ही सेवा सुरू करण्यात येत आहे. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) कंपन्यांना याबाबत सूचना दिल्या आहेत. दूरसंचार कंपन्यांनी मुंबई आणि हरियाणा सर्कलमध्ये चाचण्या सुरू केल्या आहेत. सुरुवातीच्या टप्प्यात ही चाचणी आतापर्यंत यशस्वी झाली आहे. सरकार आणि भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाच्या दबावानंतर कंपन्यांनी ही चाचणी सुरू केली आहे. सीएनपी कसे कार्य करते, याचे परिणाम जाणून घेण्यासाठी मर्यादित संख्येत त्याची चाचणी केली जात आहे. यामध्ये इनकमिंग कॉल दरम्यान नंबरसह कॉलरचे नावदेखील दिसणार आहे.

Related Articles

Back to top button