ब्रेकिंग! हार्दिक पांड्या टॉप ऑफ द वर्ल्ड
टीम इंडियाने T20 विश्वचषक जिंकल्यानंतर आज आयसीसीने नवीन क्रमवारी जाहीर केली आहे. या क्रमवारीत टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याने गरूड झेप घेतली आहे. या यादीत हार्दिक अव्वलस्थानी आला आहे. पुरुषांच्या T20 क्रमवारीत अष्टपैलूंच्या यादीत अव्वलस्थान मिळवणारा तो पहिला भारतीय ठरला.
हार्दिकने यंदाच्या विश्वचषकात गोलंदाजी आणि फलंदाजी या दोन्हीतही चांगली कामगिरी केली आणि त्याचा फायदा त्याला टी-20 क्रमवारीत झाला. बार्बाडोस येथे झालेल्या अंतिम सामन्यात हार्दिकने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शानदार कामगिरी केली होती. त्याने हेन्रिक क्लासेन आणि डेव्हिड मिलर यांच्या विकेट घेतल्या. या कामगिरीनंतर हार्दिक अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत अव्वलस्थानी आला आहे. पुरुषांच्या T20 क्रमवारीत अष्टपैलूंच्या यादीत अव्वलस्थान मिळवणारा तो पहिला भारतीय ठरला. हार्दिक सर्व दिग्गजांना मागे टाकत नंबर वन अष्टपैलू खेळाडू ठरला आहे.
हार्दिकचा रेटिंग स्कोर 222 आहे. हार्दिक आणि श्रीलंकेचा वानिंदू हसरंगा यांचे रेटिंग समान असले तरी आयसीसीने हार्दिकला पहिले स्थान दिले आहे. या यादीत ऑस्ट्रेलियाचा मार्कस स्टॉइनिस तिसऱ्या, तर सिकंदर रझा चौथ्या स्थानावर आहे. बांगलादेशचा शाकिब अल हसनही पाचव्या क्रमांकावर आहे.